Search This Blog

Tuesday 24 September 2013

Prem Kavita

ते मला कवि म्हणतात 
काही भावना शब्दात टाकताच
जे अचानक भावुक होतात
चार शब्द ओळीत मांडताच
ते मला कवि म्हणतात

जारी दुखी भावना कवितेत असतात
तरी 'वाह वा!' अशी दाद जे देतात
माझाही घडलय तुमच्यासारख
अस जे माला प्रतिक्रियेत सांगतात
ते मला कवि म्हणतात

एरवी भंगार वाटणार्‍या माझ्या भावनांना
जेव्हा ते सोन्याइतका भाव देतात
टीकाकारही तेव्हा चोख काम बजावतात
सोन्याहून मोलाचा सल्ला जे देतात
ते मला कवि म्हणतात

यापूर्वी अनेक कवि थोर झाले
समाजाला ज्यांनी खूप काही दिले
साहित्यावर ज्यांनी प्रेम केले
माझ्यासोबत त्यांना जे वंदन करतात
ते मला कवि म्हणतात

यानंतरही अनेक कवि येतील
साहित्याला जे कवेत घेतील
समाजाला जे नवनवीन बोध देतील
या कुटुंबात मलाही थोडस जे मोजतात
ते मला कवि म्हणतात




click to view large image

No comments:

Post a Comment